Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 25 March 2025
webdunia

शास्त्रज्ञांमध्ये जलसमाधीविषयी काय सांगितले आहे?

शास्त्रज्ञांमध्ये जलसमाधीविषयी काय सांगितले आहे?
, सोमवार, 17 मे 2021 (09:29 IST)
समाधी हा एक अतिशय पवित्र आणि आध्यात्मिक शब्द आहे. याचा संबंध एखाद्याच्या मृत्यूशी नव्हे तर मोक्ष, कैवल्य, स्थितप्रज्ञ, निर्वाण प्राप्त व्यक्तीशी आहे. शिवजी नेहमी समा‍धीमध्ये लीन असतात. म्हणून या शब्दाचा संबंध एखाद्या मृतकाच्या अंत्यसंस्कार पद्धतीशी नाही. एखाद्याचं दाह संस्कार केलं जातं त्याला अग्निदाग किंवा अग्निदाह म्हणतात त्याच प्रकारे जलदाग असतं. परंतु लोक परंपरा आणि प्रथेमुळे जल समाधी हा शब्दही प्रचलित आहे. तर जाणून घेऊया जलदाग किंवा जल समाधी काय आहे आणि कोणाला दिले पाहिजे.
 
1. धर्मग्रंथानुसार या जीवाची उत्पत्ती पाच घटकांपासून झाली आहे. मृत्यूनंतर, सर्व घटक आपापल्या ठिकाणी परत जातात. पंचतत्व (जमीन, आग, पाणी, हवा आणि आकाश) च्या पूर्ण विधीनुसारच व्यक्तीच्या आत्म्याला देह व मनाच्या बंधनापासून मुक्ती ‍मिळते, ज्या माध्यामातून व्यक्ती आपल्या पुढील जन्माच्या प्रवासावर निघते.
 
2. अंत्यसंस्कारानंतर भोक भरून मटकीमध्ये पाणी भरून दाहकर्म करणारा चिताची परिक्रमा करत जल अर्पित करतो व नंतर ती मटकी फोडली जाते. दाह संस्कारानंतर उरलेली राख व अस्थींचं पवित्र नदीत विसर्जन केलं जातं. पवित्र नद्यांना मोक्षदायिनी आणि मुक्ती प्रदान करणारी म्हटलं गेलं आहे.
 
3. जल समाधी सामान्य लोकांसाठी नसून सनातन हिन्दू धर्मात लहान मुलांना जमिनीत दफन केलं जात व साधुंना समाधी दिली जाते जेव्हाकी सामान्य लोकांवर दाह संस्कार केले जातात. यामागील अनेक कारणं आहेत. साधु व मुलांचे मन - तन निर्मल असतं. साधु व मुलांमध्ये आसक्ती नसते. शास्त्रांप्रमाणे 5 वर्षाच्या मुलाचा आणि 7 वर्षापर्यंतच्या मुलीवर अंत्यसंस्कार होत नाही.
 
4. साधूला समाधी दिली जाते कारण ध्यान व साधनेमुळे त्यांच्या शरीरात एक विशेष उर्जा व आभा असते म्हणून त्यांच्या शारीरिक ऊर्जेला नैसर्गिकरीत्या विसरित होऊ देतात. साधूच जल समाधी देखील घेतात. जेव्हाकी आम व्यक्तीला अग्निला समर्पित करतात ज्याने शरीराप्रती जरा देखील आसक्ती असेल तर सुटावी. तसंज दाह संस्कार केल्याने कोणत्याही प्रकाराचे रोग किंवा संक्रमण देखील नष्ट होतात.
 
5. प्राचीन काळी ऋषी-मुनी जल समाधी घेत होते. अनेक ऋषी नेहमीसाठी जल समाधी घेत होते तर काही ऋषी ठराविक काळासाठी तपस्या करण्यासाठी समाधी लावून बसत होते. भगवान श्री राम यांनी सर्व कामांपासून मुक्त झाल्यावर नेहमीसाठी सरयूच्या पाण्यात समाधी घेतली.
 
6. हिंदू धर्मात पाणी  सर्वात पवित्र मानले जाते. संपूर्ण शास्त्र, विधी, संस्कार, मंगळ कार्य इत्यादी पाण्याशिवाय अपूर्ण आहेत. वास्तविक, पाण्याचे देवता वरुण आहेत, ज्याला भगवान विष्णूचे रुप मानले जाते. म्हणून, पाणी प्रत्येक रूपात पवित्र मानले गेले आहे. म्हणूनच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी पवित्र होण्यासाठी पाण्याचा उपयोग केला जातो. शास्त्रांनुसार सृष्टीच्या सुरूवातीला फक्त पाणी होते आणि सृष्टीच्या शेवटी फक्त पाणीच शिल्लक राहील. म्हणजेच पाणी हे परम सत्य आहे.
 
7. शास्त्रानुसार देवी-देवतांच्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात. जेव्हा आपण मूर्ती स्थापित करतो तेव्हा मूर्तीच्या पूजेच्या आधी प्राण प्रतिष्ठा केली जाते. या दरम्यान देवी-देवता अंश रूपात मुर्तीमध्ये विराजमान होतात. जेव्हा मूर्ती विसर्जित केली जाते तेव्हा ते जल मार्गाने आपल्या लोकमध्ये प्रस्थान करतात.
 
8. शास्त्रांप्रमाणे भगवान विष्णु नीर अर्थात पाण्यात निवास करतात म्हणून त्यांना नारायण देखील म्हटलं जातं. जल शांती, बुद्धी, मुक्ती व ज्ञानाचे प्रतीक असल्याचे मानले गेले आहे. म्हणूनच अनेक लोक मृतकांना पाण्यात विसर्जित करतात. प्रचलित मान्यतेनुसार काही लोक जीव-जतुंना भोजन मिळावा व मृत आत्म्याला वैकुंठ धाम यासाठी जल समाधी देतात.
 
9. आशा, आसक्तींचा परित्याग करत सनातनी संतांद्वारे जीवन काळाच्या शेवटी स्वयं पाण्यात शरीर त्याग करण्याची क्रियेला जल समाधी तर जमिनती आसान लावून बसण्याच्या क्रियेला भू-समाधी म्हणतात.
 
10. पितृमेध, अन्त्यकर्म, दाह-संस्कार, श्मशानकर्म, अन्त्येष्टि-क्रिया किंवा अंत्येष्टि संस्कार हिन्दू धर्म संस्कारांमध्ये षोडश संस्कार है। हे संस्कार वेदमंत्रांच्या उच्चारण द्वारे होतात. केवळ संन्यासी आणि संत यांच्यासाठी निरग्रि असल्यामुळे शरीर सोडल्यावर भूमिसमाधी किंवा जलसमाधी देण्याचे विधान आहे. अनेक संन्यासींवर देखील अंत्यसंस्कार केलं जातं व त्यात कुठलाही दोष नाही. 
- पुस्तक-कल्याण संस्कार-अंक जानेवारी सन् 2006 ई. हून।

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shankaracharya Jayanti 2021: आज आहे शंकराचार्य जयंती, त्यांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी जाणून घ्या