Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवदर्शनापूर्वी काय करावे?

देवदर्शनापूर्वी काय करावे?
, शनिवार, 19 जानेवारी 2019 (11:53 IST)
* पादत्राणे देवळाच्या बाहेर शक्यतो आपल्या डाव्या बाजूस काढावीत.
* पाय धुण्याची सोय असल्यास पाय धुऊन 'अपवित्र: पवित्रो वा', असे म्हणत स्वत:वर तीनदा पाणी शिंपडावे.
* देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा.
* देवळाकडे जाताना हात नमस्काराच्या मुद्रेत जोडावेत.
* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या वर लावावा: 
* देवळात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वाराला नमस्कार करावा.
* देवळात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूने गाभाऱ्यापर्यंत चालत जावे (व परतताना उजव्या बाजूने बाहेर पडावे.)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर