Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवळात का जायचे?

देवळात का जायचे?
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रह्मांडाचा/भवतालाचा पंचमहाभूतांसहित असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ ऊर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज व चुंबकीय ऊर्जेचे उत्तम वाहक आहेत हे आपल्याला माहीत आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकीय वैश्विक ऊर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भवतालात रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मूर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश. त्यानंतर विधिपूर्वक मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवी मंदिर बांधले जाई.
 
आता देवळात जाताना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.
1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धुऊन मगच मंदिरात प्रवेश करतो:
ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स दूषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्य भागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शुभ ऊर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरून अनवाणी चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पांइट्स मधून ती आपल्या शरीरात प्रवेश करेल. 
जर तुमची पंच ज्ञानेंद्रिये रिसीविंग मोड मध्ये असतील तरच मंदिरातील शुभ ऊर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेऊ शकाल.
 
2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानाथ प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे:
ह्यामागेही दोन उद्देश आहेत: पहिला म्हणजे, ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद राहणारा प्रतिध्वनीत नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच, पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने काम करू लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.
 
3) आपले पाच सेन्सेस म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वास घेणे. यापुढील रुढी हे पाच सेन्सेस उद्दीपित करतात:
कापूर जाळणे: दृष्टी.
कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्यांना लावणे: स्पर्श.
मूर्तीवर फुले वाहणे: फुलांच्या अरोमामुळे वास.
कापूर व तुळशीपत्र घातलेले तीर्थ प्राशन करणे..चव. हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
घंटानाद व मंत्रोच्चारण ऐकणे: अशा प्रकारे उद्दीपित अवस्थेत व रिसीविंग मोड मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
मूर्तीच्या मागील बाजूस व भवतालात पसरलेली उर्जाही मिळावी म्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन.
पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरीरात ऊर्जेला सामावायला, अत्यंत शांत मनाने, आनंदाने, ऊर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकादशीला कोणत्या वस्तू खाणे टाळावे, जाणून घ्या