होळी 2024- फाल्गुन महिन्यातील पोर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. होळी दहन करतात त्या दिवशी अनेक प्रकारचे ज्योतिष उपाय केले जातात. तर चला जाणून घेऊ या पाच सरळ उपाय.
1. या दिवशी हनुमानजींची विधिवत पूजा केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी आणि संकट दूर होतात.
2. गवरीची माळ(कंडे)सर्व भावंडांच्या डोक्यावरून सात वेळेस ओवाळून होळीच्या आगमध्ये फेकली जाते. याचा असा अर्थ आहे की, होळीसोबतच सर्वाना लागलेली वाईट नजर देखील जळून जाते. गाईच्या गवरीला भरभोलिए म्हणतात. एका माळेत सात गवरी असतात.
3. होळीच्या दिवशी थोडीशी तुरटी घ्यावी. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून एकवीस वेळेस ओवाळून दक्षिण दिशेला फेकून दयावी.
4. काही वेळेस तुम्हाला समजत नाही की, तुम्ही सारखे सारखे आजारी का पडत आहात ? तसेच यश मिळत नाही, सर्वगुण असतांना विवाह जुळत नाही, धन हानी, या समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी काळ्या कपडयात काळी हळद बांधून सात वेळेस डोक्यावरून ओवाळून होळीमध्ये भस्म करावे.
5. जर तुमच्या जवळ धन येत असेल पण थांबत नसेल तर हा उपाय अवश्य करा. होळीच्या दिवशी चांदीच्या डब्बीत काळी हळद, नागकेशर आणि सिंदूर सोबत सजलेल्या होळीच्या सात प्रदक्षिणा कराव्या मग स्पर्श करून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik