सर्वांचा आवडता सण होळी-रंगपंचमी येत आहे. या दिवशी प्रत्येकाच्या घरात गोड आणि नमकीन पदार्थ बनतात. तसेच भारतात काही राज्यांमध्ये या दिवशी विषेश पंचपक्वांन बनतात. चला तर जाणून घेऊ या होळीला आणि रंगपंचमीला कोणते कोणते नमकीन पदार्थ बनवून या सणांचा आनंद आणि उत्साह आपण वाढवू शकतो.
1. मसालेदार बटाटा वडा-
साहित्य- 500 ग्रॅम उकडलेले व बारीक केलेले बटाटे, 1 छोटा चमचा मीठ, 1/2 छोटा चमचा तिखट, 1/2 छोटा चमचा गरम मसाला, 1/2 छोटा चमचा मोहरी, 6-7 लसूण पाकळ्या बारीक केलेल्या, 1/4 छोटा चमचा हळद, 6-7 कढीपत्ता, 1 कप बेसन, तळण्याकरिता तेल.
कृती- एका कढाईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, मग सर्व मसाले आणि कढीपत्ता टाकावा . मग 1 मिनिट कमी गॅस वर शिजवावे. मग यामध्ये बारीक केलेला बटाटा टाकावा. मग बेसनमध्ये थोडेसे मीठ टाकून त्यात पाणी घालावे व थोड्याप्रमाणात घट्ट मिश्रण बनवावे. आता बटाटा मिश्रणचे गोळे बनवावे. आता या गोळ्यांना एक एक बेसंच्या मिश्रणात बुडवून तेलात टाकावे मग मध्यम गॅस वर तळावे. आता गरम गरम बटाटा वडा हिरव्या चटनी सोबत सर्व्ह करावे.
2. कांद्याची कुरकुरित भजी-
साहित्य- पाव वाटी बेसन, 250 ग्रॅम बारीक कापलेले कांदे, 1 चमचा तिखट, थोडीशी हळद, बेकिंग पावडर 1 चिमुटभर, बडिशोप 1 चमचा, अर्धा चमचा ओवा, बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर, हींग चीमुठभर, तेल, मीठ चवीनुसार.
कृती- बारीक कापलेल्या कांद्यात योग्य प्रमाणात थोडे बेसन घालून त्यात सर्व वरील साहित्य टाकावे. या मिश्रणात पाणी टाकायचे नाही. आता या मिश्रणला एकत्रित करून त्याचे भजी बनवावी. तर चला तयार आहे आपली कांद्याची भाजी. तुम्ही यांना टोमॅटो सॉस सोबत देखील सर्व्ह करू शकतात.
3. खुसखुशीत बटाटा कचोरी
साहित्य- 3 कप रवा (बारीक), 1 कप मैदा, 2 मोठे चमचे तेल, चिमुटभर गोड पिवळा रंग, दूध आवश्यकतेनुसार, 1/2 चमचा मीठ, तळण्यासाठी तेल, 250 ग्रॅम उकडलेले व बारीक केलेले बटाटे , 2 चमचे बडिशोप, 2 हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या, तिखट, आम्सूल पूड, चाट मसाला, आले किसलेले, चवीनुसार मीठ.
कृती- रवा आणि मैदा यामध्ये मीठ, पिवळा रंग, थोडेसे तेल टाकून दूधाच्या मदतीने मळुन घ्यावे मग उकडलेल्या बटाटा मध्ये सर्व मसाले टाकून एकत्रित करावे. आता मळलेल्या मैद्याच्या पीठाचे छोटे छोटे गोळे तयार करावे. त्यामध्ये तयार केलेले बटाटा मिश्रण भरून कचोरी तयार करावी. मग कढईत तेल टाकून कचोरी तळून घ्यावी. चला तर तयार आहे गरम गरम बटाटा कचोरी, तुम्ही कचोरीला हिरवी-गोड चटनीसोबत सर्व्ह करू शकतात.
4. शंकरपाळी
साहित्य- 500 ग्रॅम मैदा, 200 ग्रॅम रवा, अर्ध कप गरम केलेले तेल मोअनसाठी, ओवा दोन चमचे, मीठ , बेकिंग पावडर, तळण्यासाठी तेल
कृती- रवा आणि मैदा एकत्रित करून त्यात तेलाचे मोअन घालावे. मग त्यात चवीनुसार मीठ, ओवा, बेकिंग पावडर मिक्स करावे. आता गरम पाण्याने हे मिश्रण माळुन घ्यावे. मग थोडा वेळ कापड़ाने झाकावे. आता मोठा गोळा घेऊन पोळपाटावर लाटून घ्यावे. व सुरीच्या मदतीने तुम्हाला हवे तसे आकार कापून घ्यावे आणि कापडावर टाकावे. मग थोडया वेळावे हे शंकरपाळी तेलात तळावीत. मग थंड झाल्यानंतर डब्ब्यात भरून ठेवावे. मग तुम्हाला हवे असेल तेव्हा तुम्ही ह्या शंकरपाळींचा आस्वाद घेऊ शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik