Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Justin Bieber Show : जस्टिन बीबरचा दिल्लीत होणार लाइव्ह कॉन्सर्ट

Justin Bieber Show: Justin Bieber will have a live concert in Delhi Justin Bieber  Show : जस्टिन बीबरचा दिल्लीत होणार लाइव्ह कॉन्सर्ट
, बुधवार, 25 मे 2022 (12:48 IST)
जर तुम्ही पॉप संगीताचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पॉप स्टार गायक जस्टिन बीबर भारतात लाईव्ह परफॉर्म करणार आहे. 18 ऑक्टोबर रोजी जस्टिन बीबर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये परफॉर्मन्स देणार आहे. ही बातमी कळताच जस्टिन बीबरचे चाहते खूप खूश झाले असून त्यांनी आतापासून कॉन्सर्टची वाट पाहण्यास सुरुवात केली आहे. जस्टिन बीबर त्याची जस्टिस वर्ल्ड टूर सुरू करत आहे, त्याअंतर्गत तो दिल्लीतही परफॉर्म करणार आहे. 
 
ऑनलाइन तिकीट बुकिंग ब्रँड बुक माय शो ने मंगळवारी या जस्टिन बीबर कॉन्सर्टची घोषणा केली आहे. जस्टिन बीबरचा वर्ल्ड टूर या महिन्यापासून मेक्सिकोतून सुरू होत आहे. ऑक्टोबरमध्ये दिल्लीतील कॉन्सर्टपूर्वी जस्टिन बीबर दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतही कार्यक्रम करणार आहे. तुम्हीही जस्टिन बीबरचे मोठे चाहते असाल तर तयार व्हा, त्याचा लाईव्ह कॉन्सर्ट पाहण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. 
 
जस्टिन बीबरच्या मे 2022 ते मार्च 2023 या कालावधीत सुमारे 30 देशांमध्ये लाइव्ह परफॉर्मन्स देत आणि 125 हून अधिक शो करत असलेल्या जगाच्या दौऱ्यावर तिकीटाची किंमत किती असेल  . जस्टिन बीबरचा दिल्लीतील कॉन्सर्ट पाहण्यासाठी चाहते बुक माय शो द्वारे तिकीट बुक करू शकतात. 2 जूनपासून तिकीट खिडकी उघडली जाईल, त्यानंतर तुम्ही आरामात तिकीट बुक करू शकता. तिकीटाच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, ते चार हजार रुपयांपासून सुरू होईल, जे सर्वात मूलभूत श्रेणीचे तिकीट असेल, त्यानंतर तिकीटाची किंमत 37 हजार 500 पर्यंत पोहोचेल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Karan Johar Birthday: करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत हे सेलेब्स पोहोचले