कॅनेडियन गायक आणि गीतकार लिओनार्ड कोहेन यांचे (८२) लॉस एंजेलिसमध्ये निधन झाले आहे. त्यांच्या फेमस ब्लू रेनकोट, द फ्यूचर, सुझेन अशा एका पेक्षा एक अजरामर गीतांनी संगीतप्रेमींना वेड लावले होते.लिओनार्ड कोहेन यांच्या फेसबुक पेजवर त्यांच्या मृत्यूविषयीची माहिती देण्यात आलेली आहे.संगीत क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तीमत्व हरपले अशी पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवर टाकण्यात आली आहे. मात्र त्यांच्या मृत्यू कसा झाला याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.