Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अँजेलिना - ब्रॅड यांना वैवाहिक जीवनाला रामराम

अँजेलिना - ब्रॅड यांना वैवाहिक जीवनाला रामराम
, बुधवार, 21 सप्टेंबर 2016 (09:54 IST)
हॉलिवूडचे बहुचर्चित कपल ब्रॅन्जेलीना अर्थात अभिनेता ब्रॅड पिट व अभिनेत्री अँजेलिना जोली यांनी लवकरच विभक्त होत एकमेकांसोबत न राहता वैवाहिक जीवनाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अमेरिकेतील माध्यमानुसार अँजेलिना जोली ने न्यायालयात विभक्त होण्याकरिता अर्ज केला आहे.
 
अनेक दिवसांपासूनच दोघांमध्ये मोठे वाद सुरु आहे अश्या प्रकरच्या बातम्या येत होत्या. मात्र कोणीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र असोसिएट प्रेस संस्था आणि इतर अमेरिका वृतपत्र यांनी दिलेल्या वृतावर दोघेही बोलत नाहीत मात्र विभक्त होत असलेल्या बातमिवर नकारही देत नाही. 
 
अँजेलिनाला सहाही मुलांना आपल्या सोबत ठेवायचं आहे. ब्रॅड ज्याप्रकारे मुलांना सांभाळतो, त्यावरुन अँजेलिना नाराज आहे. तर अनेक बाबतीत दोघांचे पटत नाही त्यामुळे वेगळे राहणे दोघांनी पसंत केले आहे. जगात ही जोडी फार प्रसिद्ध होती अनेक वर्ष सोबत राहत त्यांनी २०१४ साली लग्न केले होते. मात्र कोणालाही असे होईल असे वाटले नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा क्रांती मोर्चा: महाराष्ट्राची राजधानी हलणार