Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हद्दच झाली! शिक्षकांना पगार म्हणून बटाटे- गाजर आणि चिकन...

हद्दच झाली! शिक्षकांना पगार म्हणून बटाटे- गाजर आणि चिकन...
तसं तर अनेक वर्षांपूर्वी पगारच्या नावाखाली मीठ दिलं जात होतं. म्हणूनच सॉल्ट या शब्दावरून सॅलरी या शब्दाचा निर्माण झाला पण आता जर महिन्याभराच्या कामानंतर पगाराऐवजी भाज्या किंवा कोंबडीचे पिल्ले वाटण्यात आले तर काय म्हणाल.
आश्चर्य किंतू सत्य आहे की उझबेकिस्तानच्या एका शहरात शाळेतील शिक्षकांना कॅशऐवजी कोंबडीचे पिल्ले देण्यात आले. अमेरिकी मदतीने चालवण्यात येत असलेले रेडियो ओजोडलिक रिपोर्टप्रमाणे कैरेकलपाकस्तान रिपब्लिक मध्ये, नुकूजच्या अधिकारी देशांमध्ये बँकेत पेश्याचा कमीमुळे अंड्यातून निघालेले पिल्ले वाटले जात आहे.
 
शिक्षकाने हा निर्णय लज्जास्पद असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की मागील वर्षी आम्हाला बटाटे, गाजर आणि भोपळा देण्यात येत होता. यावर्षी पगाराऐवजी पिल्ले घेण्याचा दबाव आणत आहे.
 
एक शिक्षकाप्रमाणे आम्हाला चिकनची गरज असल्या आम्ही ते कमी किमतीत बाजारातून खरेदी करू शकतो. उल्लेखनीय आहे की पगारासाठी एक पिल्ला सात हजार सोम (उझबेकिस्तानची मुद्रा) अर्थात अडीच डॉलर समतुल्य मानला आहे, जो मार्केट वेल्यूपेक्षा दुप्पट आहे.
 
उझबेकिस्तान अनेक वर्षांपासून रोखाची कमतरता झेलत आहे जे सॅलरी आणि पेन्शनचे भुगतान उशिरा मिळण्याचं मुख्य कारण आहे. रेडियो ओजोडलिक कहाणीवर आलेल्या टिप्पणीप्रमाणे- हे लज्जास्पद आणि भ्रष्ट नोकरशाहीचे संकेत आहे.
 
तसेच थट्टा करत हे ही म्हटले आहे की- 'यात चूक काय? आपण नाश्त्यात चिकन सूप घेतात, फ्रायड चिकन लंच आणि डिनरमध्ये. यात कमीत कमी अनेक व्हिटामिन्स तर आहे'!! 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्वेने टॅँकरचे पाठविले ४ कोटींचे बील!