Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चंद्रावर 4 जी नेटवर्क

चंद्रावर 4 जी नेटवर्क
चंद्रावर पोहचून आपण स्मार्टफोनवर बोलू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता या सगळ्यावर आपला विश्वास बसत नसेल तरी हे लवकरच शक्य होणार आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा चंद्रावर 4 जी सर्व्हिस मिळेल आणि आपण सरळ जमिनीवरून एचडी लाइव्ह व्हिडिओ स्ट्रीम करू शकाल.
 
चंद्रावर 4 जी नेटवर्क उपलब्ध करवण्यासाठी नोकिया आणि वोडाफोन ने पाऊल टाकले आहे. या प्रोजेक्टमध्ये कारमेकर कंपनी ऑडी देखील सामील आहे. वर्ष 2019 मध्ये या योजनेवर काम केले जाईल. या अंतर्गत चंद्रावर 4 जी नेटवर्कच्या मदतीने बेसस्टेशनपर्यंत हाय डेफिनेशनमध्ये व्हिडिओ स्ट्रीम केले जाऊ शकतील.
 
हे प्रोजेक्ट पुढे वाढवण्यासाठी बर्लिनची PTScientists सोबत कंपन्या काम करत आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमाने 4 जी नेटवर्कची सुरवात केली जाईल. पूर्वी या कंपन्यांनी चंद्रावर 5 जी इंटरनेट सर्व्हिस सुरू करण्याचा प्रयत्न केला होता परंतू 5 जी इंटरनेट सर्व्हिसची स्टॅबिलिटी कमी असल्यामुळे हे लूनर सरफेसवर प्रामाणिकपणे काम करू शकले नाही.
 
सध्या 5 जी इंटरनेट सर्व्हिस टेस्टिंगसाठी वापरण्यात येतं. हे मिशनचे चंद्रावर असणारे पहिले प्रायव्हेट मून मिशन आहे. चंद्रावर मानव वस्तीपूर्वी मोबाईल सर्व्हिस पोहचेल हे स्पष्ट दिसत आहे. मनुष्याच्या चंद्रावर पाऊल टाकण्याच्या 50 वर्षांनंतर ही नासाची सर्वात मोठे यश असणार. यासाठी वोडाफोनने नोकियाला टेक्नॉलॉजी साथीदार बनवले आहे. नोकिया चंद्रावर शुगर क्यूबहून कमी वजनी हार्डवेअर असणारे स्पेस ग्रेड नेटवर्क विकसित करेल.
 
या प्रोजेक्टवर बर्लिनची पीटीएस साइंटिस्टसह सर्व कंपन्या काम करत आहे. हे प्रोजेक्ट 2019 मध्ये स्पेसएक्स फलकाला 9 रॉकेटद्वारे कँप कॅनावेराल, फ्लोरिडाहून लाँच केले जाईल. वोडाफोन अधिकार्‍याप्रमाणे चंद्रावर 5 जी नव्हे तर 4 जी नेटवर्क सुरू केले जाईल कारण 5 जी साठी सध्या अनेक टेस्ट सुरू आहेत त्यामुळे चंद्रावर ते काम करेल वा नाही यावर शंका आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पृथ्वीसारखे आणखी तीन नवीन ग्रह सापडले