Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

500 दिवस गुहेत राहणाऱ्या महिला बाहेर येऊन म्हटलं...

rape
, रविवार, 16 एप्रिल 2023 (15:57 IST)
स्पेनमधील एक महिला 500 दिवस एका गुहेत राहून बाहेर आली. या 500 दिवसात तिचा बाहेरील जगाशी काहीएक संपर्क नव्हता. ही घटनेकडे विश्वविक्रम म्हणून पाहिलं जातंय.
बिट्रिज फ्लेमिनी असं या महिलेचं नाव असून, तिन जेव्हा गुहेत प्रवेश केला, तेव्हा रशियना युक्रेनमध्ये घुसखोरी केली नव्हती आणि जग कोव्हिड महासाथीच्या विळख्यात सापडलं होतं.
 
गुहेत राहणं हा बिट्रिज फ्लेमिनी यांच्या प्रयोगाचा भाग होता. यावेळी शास्त्रज्ञांची त्यांच्यावर बारकाईनं नजर होती.
 
गुहेतून बाहेर निघाल्यानंतर त्या म्हणाल्या की, “मी आताही 21 नोव्हेंबर 2021 लाच अडकली आहे. या दिवसानंतर जगात काय काय झालं, याची मला कल्पनाच नाही.
बिट्रिज फ्लेमिनी या आता 50 वर्षे वयाच्या आहेत. त्यांनी गुहेत प्रवेश केला, तेव्हा त्या 48 वर्षे वयाच्या होत्या. 70 मीटर खोल गुहेत त्यांनी त्यांचे 500 दिवस काढले. गुहेत त्या नियमित व्यायाम करत, तसंच लोकरीच्या टोप्या विणण्याचं काम केलं.
 
त्यांच्या सपोर्ट टीमच्या माहितीनुसार, गुहेत 60 पुस्तकं आणि एक हजार लीटर पाणी ठेवण्यात आलं होतं.
 
त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या टीममध्ये मानसशास्त्रज्ञ, संशोधक आणि स्पीलेलॉजिस्ट यांचा समावेश होता. मात्र, यातल्या कुठलाही तज्ज्ञांनी बिट्रिज फ्लेमिनी यांच्याशी संपर्क केला नाही.
गुहेत कशा राहिल्या?
स्पॅनिश टीव्ही स्टेशनच्या एका फुटेजमध्ये बिट्रिज हसत हसत गुहेतून बाहेर येताना दिसतायेत आणि त्यांच्या टीमची गळाभेट घेताना दिसतायेत.
 
गुहेतून बाहेर आल्यानंतर त्यांनी आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली.
 
पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “मी दीड वर्षांपासून गप्प आहे. मी इतरांशी नव्हे, स्वत:शी बोलत असे.”
 
बिट्रिज गुहेतून बाहेर आल्यानंतर बऱ्याच जणांशी बोलल्या. त्यांचे अनुभव सांगण्यासाठी पत्रकार अक्षरश: त्यांच्या मागे लागले.
 
त्या म्हणाल्या की, “मी माझं संतुलन हरवून बसलीय. त्यामुळे मला पकडलं गेलंय. तुम्ही मला किमान अंघोळीची तरी परवानगी द्याल का? दीड वर्षांपासून पाण्याला स्पर्शही केला नाही. मी तुम्हाला थोड्या वेळानं भेटेन. चालेल तुम्हाला?”
 
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, गुहेत शिरल्याच्या दोन महिन्यानंतर त्यांना तारीख-वेळ यांबाबत काहीच कळलं नाही.
 
त्या म्हणाल्या, “एक वेळ अशी होती की, मला दिवस मोजणंही कठीण झालं. मला वाटतं की, मी 160 ते 170 दिवसांसाठी गुहेत होती.”
आवाजाचे भास होतात...
बिट्रिज फ्लेमिनी यांनी अवघड क्षणाबद्दल सांगताना म्हटलं की, एकदा गुहेत माश्यांनी हल्ला केला होता. तेव्हा स्वत:ला त्यापासून झाकून घेत कसंतरी वाचवलं.
 
अनेकदा वेगवेगळे आवाज ऐकायला येण्याचे भास सुद्धा झाल्याचं त्या सांगतात. जेव्हा तुम्ही गप्प राहता, तेव्हा तुमच्या डोक्यातच असे वेगवेगळे आवाज तयार होतात आणि भास होऊ लागतात.
 
शास्त्रज्ञ हे शोधू पाहतायेत की, अशाप्रकारे गुहेत राहिल्यानं व्यक्तीच्या सामाजिक एकटेपणावर काय परिणाम होतो आणि वेळेबाबत व्यक्तीवर काय परिणाम होतो.
 
बिट्रिज फ्लेमिनी यांच्या सपोर्ट टीमचं म्हणणं आहे की, गुहेत जास्तीत जास्त वेळ राहण्याचा विक्रम त्यांनी मोडला आहे. मात्र, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं याची अद्याप दखल घेतली नाही.
 
एखाद्या दुर्घटनेनंतर एखादी व्यक्ती ढिगाऱ्याखाली बरेच दिवस राहिल्याचे विक्रम गिनीज बुकध्ये नोंदवलेले आहेत. मात्र, गुहेत स्वत:हून राहिल्याची नोंद आहे का, हे अद्याप समोर आलं नाहीय.
 
33 चिली आणि बोलिव्हियाई मजूर 2010 मध्ये तांबे आणि सोन्याच्या खाणीत अडकले होते. 688 मीटर खोल खाणीत 69 दिवस हे मजूर अडकून होते.

Published By- Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2023 MI Vs KKR :अर्जुन तेंडुलकरने पदार्पण केले, एमआय कडून खेळणार