Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिलावल भुट्टो होणार पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते!

bilawal bhutto
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याचे निश्चित झाले आहे. याआधी 64 वर्षीय खुर्शीद शहा यंच्याकडे ही जबाबदारी होती. आता ते 28 वर्षीय बिलावल भुट्टो यांचे सल्लागार म्हणून काम पा‍हतील. यासंदर्भात 'द एक्सप्रेस ट्रिब्युन'ने वृत्त प्रसिद्ध केले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलेले बिलावल भुट्टो सध्या 'पाकिस्तान पीपल्स पार्टी'चे अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी सिंध प्रांतातून निवडणूक लढविण्याचा निर्णय बिलावल यांनी घेतला होता. बिलावल यांना विरोधी पक्षनेता करण्याचा निर्णय खुर्शीद शहा यांनीच जाहीर केला.' आता बिलावल भुट्टो विरोधी पक्षनेते होतील. मी त्यांचा सल्लागार म्हणून काम करेन आणि त्यांचे वडील असिफ अली झरदारी बिलावल यांना ससंदीय राजकराणचे धडे देतील, असे शहा यांनी पत्रकारांना सांगितले. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील पहिले महाआरोग्य शिबीर




Akshaya Tritiya
Akshaya Tritiya