Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दहशतवादी हाफिज सईदच्या घराजवळ भीषण स्फोट, 2 जणांचा मृत्यू

दहशतवादी हाफिज सईदच्या घराजवळ भीषण स्फोट,  2 जणांचा मृत्यू
, बुधवार, 23 जून 2021 (14:25 IST)
इस्लामाबाद- लाहोरमध्ये दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा नेता हाफिज सईदच्या घराजवळ बुधवारी मोठा स्फोट झाला. या स्फोटात दोन लोक ठार झाले तर महिला व मुलांसह 10-20 लोकं जखमी झाले आहे.
 
जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. स्फोट कसा झाला याचा तपास केला जात आहे.
 
जौहर टाउनमध्ये घडली स्फोटची घटना
मिळालेल्या माहितीनुसार, जौहर टाउनच्या अकबर चौकात हा स्फोट झाला आहे. घटनास्थळी सुरक्षा पथक दाखल झाले आहे. मदत व बचावकार्य सुरू आहे. या स्फोटात जखमी झालेल्यांना ऑटोरिक्षा आणि खासगी कारमध्ये लाहोरच्या जिन्ना रुग्णालयात नेण्यात आले होते, असे मदत कामगारांचे म्हणणे आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, हाफीज सईद ज्या परिसरात राहत होता, तिथून जवळच एका घरात हा स्फोट झाला आहे. या घरात संशायस्पद स्थितीत अनेक लोक ये जा करत होते. स्फोट झाला तेव्हा हाफीज सईद घरीच होता का, याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
 
स्फोट खूप जोरदार
या घटनेच्या साक्षीदारांचे म्हणणे आहे की स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की आजूबाजूची घरे आणि इमारतींचे काच तुकडे तुकडे झाले. या स्फोटात काही इमारतींचे नुकसान झाले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकला गेला.
 
मोटरसायकलमध्ये स्फोट
अद्याप स्फोटाचा प्रकार कळू शकला नाही. मात्र एका प्रत्यक्षदर्शीने जिओ टीव्हीला सांगितले की, एका व्यक्तीने मोटरसायकल घराबाहेर सोडली आणि नंतर त्यात स्फोट झाला. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून तपास सुरू केला आहे. परिसरात वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
 
पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून पंचनामा करत आहे. स्थानिक सुरक्षा संस्थेच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती मिळेपर्यंत कोणताही अंदाज व्यक्त करता येणार नाही. असंही सांगितलं जात आहे की, आधी गॅसची पाइपलाइन फुटली असावी आणि त्यानंतर  IED चा स्फोट झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले - डेल्टा प्लस व्हेरिएंट प्रकरणांवर बारकाईने नजर ठेवली जाईल, अधिकार्‍यांना दिला आदेश