Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानात आत्मघातकी स्फोट, नेत्यासह १४ ठार

पाकिस्तानात आत्मघातकी स्फोट, नेत्यासह १४ ठार
, बुधवार, 11 जुलै 2018 (12:03 IST)
पाकिस्तानच्या पेशावर एका निवडणूक बैठकीत आत्मघातकी स्फोट घडवून आणण्यात आलाय. या स्फोटात अवामी नॅशनल पार्टी (ANP) चा नेता हारुन बिल्लौरसहीत कमीत कमी चार लोक ठार झालेत. न्यूज एजन्सी 'एएनआय'नं दिलेल्या माहितीनुसार, आत्मघातकी हल्लेखोरानं केलेल्या या हल्ल्यात तब्बल १४ जणांनी आपले प्राण गमावलेत. याशिवाय जवळपास ६५ लोक जखमी झालेत. जखमींना जवळच्याच रुग्णालयात हलवण्यात आलं. 
 
स्फोट झाला तेव्हा बिल्लौर आणि एएनपीचे कार्यकर्ते पार्टीच्या एका बैठकीसाठी एकत्र जमले होते. बिल्लौर मंचाजवळ पोहचले तेव्हा फटाकेही फोडले जात होते. तेव्हाच एका आत्मघाती हल्लेखोरानं स्वत:ला स्फोटात उडवून दिलं. या हल्ल्यात बिल्लौर गंभीर जखमी झाले होते... त्यांना तातडीनं हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
 
उल्लेखनीय म्हणजे, बिल्लौर यांचे वडील तसंच एएनपीचे ज्येष्ठ नेते बशीर अहमद बिल्लौर हेदेखील २०१२ मध्ये एका आत्मघाती हल्ल्यात मारले गेले होते. २०१२ मध्ये पेशावरच्या एका बैठकीदरम्यान तालिबान हल्लेखोरांनी हा आत्मघाती हल्ला घडवून आणला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्विटरवर फॉलोअरमध्ये सुषमा स्वराज यांची आघाडी