Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टॅटूमुळे गमावली दृष्टी

tattoo
सध्या टॅटूही एक लोकप्रिय फॅशन झाली आहे. पण कॅनडातील एका मॉडेलला टॅटू काढणे महागात पडले आहे. कॅट गलिंगर नावाच्या मॉडेलला आपल्या डोळ्याच्या आत टॅटू बनवायचा होता. त्यासाठी कॅट टॅटू काढण्यासाठी गेली. मात्र, हा टॅटू काढल्यामुळे तिला आपल्या डोळ्यांची दृष्टी गमवावी लागली आहे.
 
टॅटू बनवताना झालेल्या एका चुकीमुळे मॉडेलला मोठा फटका बसला आहे. या घटनेनंतर कॅट गलिंगरने आपल्या फेसबुकवर फोटो शेअर करत घटनेची माहिती दिली आहे. आता गलिंगरने आपल्या एका डोळ्याची दृष्टी गमावली आहे.
 
24 वर्षांची गलिंगरने जे फोटोज शेअर केले आहेत त्यात तिच्या डोळ्यातून लिक्विड बाहेर पडताना दिसत आहे. तसेच डोळ्याला किती इजा झाली आहे हे सुद्धा दिसत आहे. ‍गलिंगरने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की डोळ्यातून लिक्विड निघण्यास सुरूवात होताच ती रूग्णालयात गेली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपा खासदार म्हणतात छत्तीसगडमधील मुली एकदम ‘टनाटन’