माजलेल्या चीनने मुजोरी केली आहे. चीनमध्ये निर्माण करण्यात आलेले बूट तिरंगा असलेल्या बॉक्समधून पाठवण्यात येत आहेत. यामध्ये अल्मोडा येथील एका दुकानदाराला तिरंग्याच्या बॉक्समधून बूट आले आहेत. ही घटना उत्तराखंड येथील घडली आहे. त्यामुळे या विरोधात रीतसर तक्रार दुकानदाराने पोलिसांकडे केली आहे. बूटांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. डोकलाममध्ये भारत आणि चीनमध्ये दोन महिन्यांपासून जोरदार तणाव आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिनी कंपन्यांनी तिरंगा असलेल्या बॉक्समधून बूट पाठवण्याचा मुजोर पणा केला आहे.
सर्व माल तिरंगा असलेल्या बूटांच्या पॅकिंग केला होता. दुकानदार बिशन सिंह बोरा सांगतात की ‘प्रत्येक बूटाच्या बॉक्सवर तिरंगा होता. याशिवाय त्यावर मेड इन चायना असा उल्लेख होता,’ असे त्यांनी सांगितले आहे.