Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच असलचा अमेरिकेचा दावा

दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच असलचा अमेरिकेचा दावा
लंडन , गुरूवार, 4 जुलै 2019 (16:38 IST)
भारताला हवा असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानातच असल्याची माहिती अमेरिकेतील तपास संस्था एफबीआयने लंडनच्या एका कोर्टाला सादर केली आहे. दाऊद पाकिस्तानातील कराचीत बसूनच आपले आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेटवर्क चालवत आहे.
 
दाऊदचा सहकारी जाबिर मोतीवाला यांच्या अमेरिकेतील प्रत्यर्पणाच्या सुनावणीच्या एक दिवस आधी अमेरिकेचे वकील जॉन हार्डी यांनी दाऊद पाकिस्तानात असल्याची माहिती दिली. एफबीआय न्यूयॉर्कमध्ये डी कंपनीच्या लिंकचा तपास करत असल्याची माहितीही हार्डी यांनी दिली. डी कंपनीचे हात पाकिस्तान, भारत आणि यूएईपर्यंत 
पोहोचले आहेत, असेही हार्डी यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी दाऊद भारतीय मुसलमान असून तो पाकिस्तानात राहतो, अशी माहिती दिली.
 
गेल्या 10 वर्षांच्या काळात दाऊदच्या डी कंपनीने अमेरिकेतही आपले बस्तान बसवायला सुरुवात केली. लंडन कोर्टात मोतीवाला याची चौकशी सुरू असून त्याला एफआयने 2018 मध्ये एका एजंटद्वारे पकडले होते.

मोतीवाला हा थेट दाऊदच्या संपर्कात होता. मोतीवाला यांच्या कारवायांची माहिती कोर्टापुढे सादर केल्यानंतर कोर्टाने मोतीवालाला जामीन नाकारला आहे. आता मोतीवालाला एका व्हिडिओ लिंकद्वारे 28 ऑगस्ट या दिवशी होणार्‍या सुनावणीत सहभागी होण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑनलाईन शॉपिंग करताना आधी फर्जी वेबसाइट्सची ओळख करून घ्या