अमेरिकन कॉंग्रेसची प्रतिनिधीगृह आणि सिनेट ही दोन सभागृह सरकारी खर्चाला मंजुरी देत असतात. सत्तारुढ रिपब्लिकन पार्टीने कनिष्ट सभागृहात बहुमतात विधेयक पास केल्यानंतर वरिष्ठ सभागृहात विधेयक पारित करण्यासाठी त्यांना विरोधी डेमोक्रेट पार्टीच्या समर्थनाची आवश्यकता आहे. डेमोक्रेट पार्टीने समर्थन दिले नाही, तर अमेरिकेतील सरकारी कामकाज ठप्प होण्याचे संकेत आहेत. १९९५ नंतर तिसऱ्यांदा अमेरिकेवर हे संकट आले आहे.