अमेरिकेने पुन्हा दहशतवादी देश पाकिस्थानचे कान टोचले आहेत. आतंकवादावर जोरदार टीका करत आपल्या देशात मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माइंड हाफिज सईदची वाचवत आह्रेत म्हणून पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांना अमेरिकेनं झापले आहे. या प्रकरणात अमेरिका असे म्हणते की हाफिस सईदला आम्ही दहशतवादी समजतो, त्यामुळे पाकिस्ताननं त्याच्यावर लवकर कठोर कारवाई करावी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नॉर्ट यांनी माध्यमांसमोर आपले मत मांडले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला 'साहेब' असे संबोधले होते. हाफिज सईद साहेबांविरोधात पाकिस्तानात कोणताही गुन्हा दाखल नाही, असं वादग्रस्त विधान केले होते. यामध्ये पाकिस्तानमधल्या जिओ टीव्हीनं घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी असे मत व्यक्त केले होते. ते म्हणाले की हाफिज सईद साहेबांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्यानं आम्ही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र कोणी व्यक्तीने जर त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला तर सरकार कारवाई करेल, असंही शाहीद खकान अब्बासी म्हणाले आहेत, त्यामुळे लगेच अमेरिकेनं पाकिस्तानला इशारा दिला आहे. हाफिज सईदवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी, असंही हिथर नॉर्ट यांनी सुनावलं आहे. त्यामुळे आता पाकिस्थानला लवकरात लवकर कारवाई करणे भाग पडणार आहे.