Publish Date: Tue, 22 Nov 2016 (11:43 IST)
Updated Date: Tue, 22 Nov 2016 (11:44 IST)
विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक केलेला खटला 25 दशलक्ष अमेरिकन डॉलर देऊन मिटविण्यास अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तयारी दाखवली आहे. ट्रम्प युनिव्हर्सिटी स्थापन करून तिच्या माध्यमातून स्थावर मालमत्तांच्या व्यवसायात यशस्वी कसे व्हावे हे शिकविण्याचे आश्वासन दिले होते. आता हे विद्यापीठच अस्तित्वात नाही. युनिव्हर्सिटीत नाव नोंदविण्यास विद्यार्थ्यांनी 35 हजार डॉलरचे शुक्ल भरले होते. विद्यापीठाने आश्वासन पूर्ण केले नाही व फसवणूक झाली असा विद्यार्थ्यांचा आरोप होता.
webdunia
Publish Date: Tue, 22 Nov 2016 (11:43 IST)
Updated Date: Tue, 22 Nov 2016 (11:44 IST)