बुधवारी पहाटे न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.0 इतकी मोजण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने सांगितले की, भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा कोणतीही हानी झालेली नाही.
ही दिलासादायक बाब आहे. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, क्राइस्टचर्चच्या पश्चिमेला सुमारे 124 किलोमीटर अंतरावर मध्य दक्षिण बेटावर भूकंप झाला. जिओनेट मॉनिटरिंग एजन्सीने सांगितले की, 14,000 लोकांनी भूकंप जाणवल्याचे सांगितले आहे. एजन्सीने लोकांच्या हवाल्याने सांगितले की, भूकंपामुळे काही ठिकाणी अलार्मही वाजवण्यात आला होता.
2011 मध्ये येथे 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, ज्यामध्ये 185 लोकांचा मृत्यू झाला होता.