Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेत्रविशारद फर्डिनान्ड मोनोयर यांना डूडलच्या माध्यमातून आदरांजली

नेत्रविशारद फर्डिनान्ड मोनोयर यांना डूडलच्या माध्यमातून आदरांजली
, मंगळवार, 9 मे 2017 (11:35 IST)

जगप्रसिद्ध फ्रेंच नेत्रविशारद फर्डिनान्ड मोनोयर यांच्या 181 व्या जयंतीनिमित्त ‘गूगल’ ने डूडलच्या माध्यमातून आदरांजली दिली आहे. फर्डिनान्ड मोनोयर यांनी डायोप्टर या उपकरणाचा शोध लावला आहे. या उपकरणाच्या माध्यमातून लेन्सच्या क्षमतेची तपासणी करता येते. जगभरातील असंख्य नेत्ररुग्ण फर्डिनान्ड यांच्या कार्यामुळेच चांगली दृष्टी मिळवू शकले आहेत. नेत्रतज्ज्ञाकडे लावण्यात आलेला मोनोयर चार्ट फर्डिनान्ड यांनीच विकसित केला आहे. मोनोयर यांनी विकसित केलेला डायोप्टर आणि मोनोयर चार्ट 1872 पासून जगभरात वापरला जाऊ लागला. मोनोयर चार्टमध्ये वेगवेगळ्या आकारातील अक्षरांचा वापर केलेला असतो, ज्याच्या माध्यमातून दृष्टीची क्षमता पडताळता येते.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘आयर्न लेडी’ इरोम शर्मिला यांचे जुलैमध्ये शुभमंगल