‘अफस्पा’ कायद्याविरोधात 16 वर्ष उपोषण करणाऱ्या मणिपूरच्या ‘आयर्न लेडी’ इरोम शर्मिला विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या जुलैमध्ये मित्र डेजमन कॉटिनहोसोबत इरोम शर्मिलांचा विवाह होणार आहे. याआधी मणिपूरमधून अफस्पा कायदा हटवण्याच्या मागणीसाठी इरोम शर्मिलांनी 16 वर्ष उपोषण केलं होतं. अखेर गेल्या वर्षी 9 ऑगस्टला त्यांनी उपोषण सोडलं. त्यानंतरही समाजकार्याच्या ध्यासातून त्यांनी ‘प्रजा’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.रोम शर्मिला लग्नानंतर तमिळनाडूत स्थायिक होणार आहेत.