Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिंदू आणि ज्यू महिलेचा यूकेमध्ये आंतरवंशीय समलैंगिक विवाह

हिंदू आणि ज्यू महिलेचा यूकेमध्ये आंतरवंशीय समलैंगिक विवाह
लंडन , शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (09:16 IST)
समलैंगिक नाही तर वंशद्वेषालाही चपराक देणारे उदाहरण समोर आले आहे. युनायटेड किंग्डममध्ये हिंदू आणि ज्यू महिलेने समलैंगिक विवाह केला आहे. हा लग्नसोहळा पूर्णपणे भारतीय पद्धतीनुसार करण्यात आला. हा विवाह संपूर्ण यूकेमधला पहिला आंतरवंशीय समलैंगिक विवाह ठरला आहे.
 
कलावती मिस्त्री आणि मिरीयम जेफरसन या दोघींनी मोठ्या धाडसाने हा विवाहाचा निर्णय घेतला. वीस वर्षांपूर्वी कलावती अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी गेली होती. तिथेच कलावतीची भेट मिरीयमशी झाली. अखेर वयाच्या 48 व्या वर्षी दोघी हिंदू विवाह पद्धतीप्रमाणे लग्नबंधनात अडकल्या. ‘हा प्रवास सोपा नव्हता. आपली संस्कृती आणि कुटुंबाशी झगडून हा निर्णय घेणे फार अवघड होते. फार लहान वयातच मला समलैंगिक आकर्षण असल्याची जाणीव झाली होती. कुमारवयातच मी लेस्बियन असल्याचे स्वीकारले. मात्र हे सगळे घरच्यांना समजावून सांगणे फार अवघड गेले. कालांतराने त्यांनीही समजून घेऊन मला साथ दिली असल्याचे कलावतीने सांगितले. मिरीयमसुद्धा या विवाहामुळे खुष आहे. कलावतीला भारतीय पद्धतीने विवाह करण्याची फार इच्छा होती. तिच्या आनंदातच माझा आनंद आहे, असे मिरीयम म्हणाली. कलावतीच्या परिवारानेही हसतमुखाने या जोडप्याचे स्वागत केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विराट अनुष्काला लाडाने काय म्हणतो…?