नवी दिल्लीतील अमेरिकन एम्बसीच्या ट्विटराईट्सच्या पसंतीनुसार अमेरिकन राजदूतांकडून ‘या’ साडीची निवड राजदूत मेरीके कार्लसन यांनी केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी भारताच्या स्वातंत्र्यदिनी साडी नेसण्याचा मानस बोलून दाखवला होता. ट्विटराईट्सच्या प्रतिक्रियांनंतर अखेर मेरीके यांनी कांजिवरम साडी नेसून आपला राष्ट्रीय उत्सव साजरा केला. साडी परिधान केलेला फोटोही त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
भारताच्या 70 व्या स्वातंत्र्यदिनी साडी नेसून पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावण्याची इच्छा मेरीके कार्लसन यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. जमदानी, ड्युपिअन, कांजिवरम आणि टसर अशा चार प्रकारच्या साड्या परिधान करुन त्यांनी आपले फोटो ट्विटरवर शेअर केले होते. आपण कोणती वेशभूषा करावी, हे त्यांनी ट्विटराईट्सना सुचवण्यास सांगितले होते.
#SareeSearch या हॅशटॅगसह आपली मते व्यक्त करण्याचे आवाहन मेरीके यांनी केले होते. ट्विटर यूझर्सच्या
सजेशन्सनंतर लाल रंगाच्या कांजिवरम साडीची निवड मेरीके यांनी केली. फोटो ट्वीट करताना ‘यशस्वी! भारताच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला हजेरी लावण्यास प्रचंड उत्सुक आहे. ट्विटराईट्सच्या पसंतीनुसार कांजिवरम साडी नेसली आहे.’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.