Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इम्रान खानची माजी पत्नी रेहम खानने केले तिसरे लग्न

imran khan
, शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (21:36 IST)
ब्रिटिश-पाकिस्तानी पत्रकार आणि इम्रान खानची दुसरी पत्नी रेहम खानने दुसरं लग्न केलं आहे. ट्विटरवर याची घोषणा करत रेहमने 'जस्ट मॅरीड' फोटो पोस्ट केला आहे. दुसर्‍या पोस्टमध्ये तिने लिहिले की, "शेवटी मला एक माणूस सापडला आहे ज्यावर मी विश्वास ठेवू शकते ." तिने पाकिस्तानी पत्रकार मिर्झा बिलालसोबत लग्न केल्याचे सांगण्यात येत आहे. रेहमने त्याच्यासोबतचा एक फोटोही ट्विट केला आहे. 
 
 रेहम खानचे हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी तिने 2014 मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटर इम्रान खानसोबत लग्न केले होते. मात्र, वर्षभरानंतरच दोघांचा घटस्फोट झाला. यापूर्वी रेहमचे पहिले लग्न 1993 मध्ये एजाज रहमानसोबत झाले होते. 2005 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. 
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2023 Auction : हैदराबादने इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला 13.25 कोटींमध्ये विकत घेतले, विल्यमसन गुजरातमध्ये