चीन आणि तैवानमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधून मोठी बातमी येत आहे. इस्रायलने गाझा येथे क्षेपणास्त्र डागण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी गटासह अनेक दिवसांच्या तणावानंतर इस्रायलने देशांतर्गत 'विशेष दर्जा' घोषित केला आहे. यानंतर काही वेळातच गाझाने प्रत्युत्तर देत इस्रायलवर दोन क्षेपणास्त्रे डागली. इस्रायल टीव्हीने हा दावा केला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, गाझा हल्ल्यातील मृतांची संख्या चार झाली आहे. त्याचवेळी पॅलेस्टिनी मिलिटंट ग्रुपने म्हटले आहे की, या हल्ल्यात त्यांचा कमांडरही मारला गेला आहे.
इस्रायली सैन्याने होम फ्रंटवर विशेष परिस्थिती घोषित केली आहे. याअंतर्गत सीमेपासून 80 किलोमीटरपर्यंतच्या परिसरात शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी होणार्या हालचालींवरही मर्यादा आल्या आहेत.