लेबनॉनची राजधानी बैरुत येथे झालेल्या एका स्फोटात हमासचे उपाध्यक्ष सालेह अल-अरुरींचा मृत्यू झाला आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांना शिक्षा देऊ असं लेबनॉनने जाहीर केलं आहे. यावर उत्तर देताना इस्रायलने अरुरीवरचा हल्ला म्हणजे लेबनॉनवर केलेला हल्ला नव्हता असं स्पष्ट केलं आहे.
इस्रायलच्या प्रवक्त्याने सांगितले, हमास नेत्याविरोधात केलेल्या एका सर्जिकल स्ट्राइकमध्ये सालेह अल अरुरी मारले गेल आहेत.
हमासने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच त्यांच्याजवळच्याच मानल्या जाणाऱ्या हिजबुल्लाहने हा लेबनॉनच्या सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचं म्हटलं आहे.
या युद्धात लेबनॉनलाही ओढलं जात आहे असा आरोप लेबनॉनच्या पंतप्रधानांनी इस्रायलवर केला.
लेबनॉनमधील माध्यमांतील बातम्यानुसार हमासचे उपाध्यक्ष सालेह अल अरुरींचा मृत्यू बैरुतच्या दक्षिणेस एका ड्रोन हल्ल्यात झाला.
अरुरी यांच्याशिवाय आणखी सहा लोक मरण पावले आहेत. त्यात हमासचे दोन सैन्य कमांडर आणि बाकीचे चार हमास सदस्य होते.
अरुरी हमासच्या सशस्त्र कासम ब्रिगेडशी संबंधित एक महत्त्वाचे नेते होतेच, त्याहून त्यांना हमासप्रमुख इस्माइल हानिया यांचे निकटवर्तीय मानलं जायचं.
हिजबुल्लाह आणि हमासमध्ये संबंध वाढवण्यासाठी ते लेबनॉनमध्ये होते.
इस्रायली सरकारचे एक प्रवक्ते मार्क रेगेव यांनी या हत्येमध्ये इस्रायलचाच हात आहे असं जवळपास स्पष्टच केलं होतं. मात्र एमएसएनबीसी वाहिनीशी बोलताना त्यांनी या घटनेसाठी जे कोणी कारणीभूत असतील, पण हा लेबनॉन सरकारवर हल्ला नव्हता हे स्पष्ट केलं पाहिजे. तसेच हा कोणत्याही प्रकारे दहशतवादी संघटना हमासवर हल्ला नव्हता.
ज्यांनी कोणी हे केलं त्यांनी हमासच्या नेतृत्वावर सर्जिकल स्ट्राइक केला. त्यांना हमासचा विरोध करायचा होता हे स्पष्ट आहे.
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल झालेल्या मोहिमेत हमासचे जे लोक मरण पावले त्यातील अरुरी हे सर्वात मोठे नेते आहेत.
7 ऑक्टोबर 2023 रोोजी हमासने गाझापट्टीतून इस्रायलवर हल्ला केला. या संघटनेचे लोक इस्रायली सीमेच्या आत घुसले आणि तिथल्या गावांवर हल्ला केला. त्या हल्ल्यात 1200 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आणि हमासचे हे लोक जवळपास 240 लोकांना घेऊन गेले होते.
याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने मोहीम सुरू केली आणि हमास मुळासकट संपत नाही तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही असं स्पष्ट केलं.
हमासच्या नियंत्रणात असलेल्या आरोग्य मंत्रालयाने यामध्ये आतापर्यंत 22 हजारापेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिक मेल्याचं सांगितलं आहे. यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
या युद्धादरम्यान हिजबुल्लाहने इस्रायल सीमेजवळ इस्रायली सैन्यावर रॉकेट डागली आहेत.
इस्माइल हानिया काय म्हणाले?
लेबनॉनची सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सालेह अल अरुरी यांचा मृत्यू इस्रायलच्या ड्रोन हल्ल्यात झाला. हा हल्ला बैरुतच्या दक्षिणेस दाहिअमध्ये हमासच्या एका कार्यालयात झाला. प्रत्यक्षदर्शीने रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, त्याला एका उंच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एक मोठी भेग पडल्याचं दिसलं आणि त्या इमारतीच्या आसपास मोठ्या संख्येने अग्निशमन कर्मचारी आणि आरोग्यसेवक जमा झाले होते.
सोशल मीडियातील एका व्हीडिओत या हल्ल्यात एका कारला आग लागली असून तिथल्या रहिवाशी विभागातील इमारतींचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतं. दाहिअ हा लेबनॉनमधील हिजबुल्लाहचा गड मानला जातो.
हमासच्या राजकीय शाखेचे प्रमुख इस्माइल हानिया यांनी या हल्ल्याला भ्याड दहशतवादी कारवाई असं संबोधून लेबनॉनच्या सार्वभौमत्वावर हल्ला आणि आक्रमकतेची मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न असं म्हटलं आहे.
हिजबुल्लाहने म्हटलंय, अरुरी यांच्या मृत्यूला ते लेबनॉन, या देशाचे नागरिक, त्यांचं संरक्षण, सार्वभौमत्वाविरोधातील हल्ला मानतात. हे प्रतिकात्मक असून राजकीय आणि संरक्षणसंबंधी हा संदेश आहे.
ही संघटना म्हणते, युद्धभूमीवरची ही एक गंभीर घटना आहे. या अपराधाला विनाउत्तर आणि विनाशिक्षा माफ केलं जाणार नाही हे स्पष्ट करत आहोत.
आमचा हात बंदुकीच्या चापावर आहे. आमची संरक्षणासाठी तत्परता आणि तयारी सर्वोच्च पातळीवर आहे.
हिजबुल्लाह आणि हमासचं समर्थन करणाऱ्या इराण यांनी, या हल्ल्यामुळे प्रत्युत्तराची एक आणखी लाट सुरू होणार यात संशय नाही असं म्हटलं आहे.
2 जानेवारी रोजी संध्याकाळी इस्रायली संरक्षण कॅबिनेटची बैठक होणार होती त्यात गाझा युद्धाबाबतीत एक योजना सादर होणार होती मात्र ती रद्द करण्यात आली.
इस्रायली माध्यमांतील बातम्यांनुसार वेस्ट बँकमध्ये अरुरी यांच्याकडे सैन्यशाखेचे आगामी प्रमुख म्हणून पाहिलं जात होतं.
2014मध्ये वेस्ट बँकमध्ये तीन तरुणांच्या हत्येमागे त्यांचा हात होता असं मानलं जातं. तसेच ते अनेक हल्ल्यांच्या प्रकरणात इस्रायली तुरुंगवासही त्यांनी भोगल्याचं सांगितलं जातं.
टाइम्स ऑफ इस्रायलच्या माहितीनुसार इराण आणि हिजबुल्लाहशी संबंध असलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये अरुरी होतेय 27 ऑक्टोबररोजी इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमधील त्याच्या अरुरा शहरातील घराला उद्ध्वस्त केलं होतं.
Published By- Priya Dixit