Israel Hamas War: गाझा पट्टीतून हमास या दहशतवादी संघटनेकडून शनिवारी इस्रायलवर पाच हजार रॉकेट डागण्यात आले. त्यानंतर दोघांमध्ये तणावाचे वातावरण आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. तणावाच्या परिस्थितीत इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली. यादरम्यान, दोन्ही पंतप्रधानांमध्ये हल्ल्याच्या सद्यस्थितीवर खुलेपणाने चर्चा झाली. इस्रायलने दिलेल्या माहितीबद्दल पंतप्रधान मोदींनी नेतन्याहू यांचे आभार मानले. या कठीण काळात भारत इस्रायलच्या पाठीशी उभा असल्याचे आश्वासनही पंतप्रधान मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना दिले.
सोशल मीडिया साइटवर पोस्ट करून माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की मी पंतप्रधान नेतन्याहू यांना फोन कॉल आणि सद्य परिस्थितीबद्दल अपडेट्स दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींनी दहशतवादावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात मारले गेलेले निष्पाप बळी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो असेही ते म्हणाले. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात मारले गेलेले निष्पाप बळी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो असेही ते म्हणाले.
इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन म्हणाले की, मी पुन्हा पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. आम्हाला आमच्या भारतीय बंधू-भगिनींकडून खूप पाठिंबा मिळाला आहे. जरी मी सर्वांचे आभार मानू शकत नाही. मी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचे आभार मानतो.
अजूनही 30 जणांना ओलीस ठेवण्यात आले आहे. इस्त्रायली संरक्षण दलांनी गाझामधील हमासच्या 1290 स्थानांवर हल्ले करून ते नष्ट केल्याचेही सांगण्यात आले.