जपानच्या कागोशिमा प्रांतातील साकुराजिमा ज्वालामुखीचा रविवारी रात्री उद्रेक झाला. त्यातून राख आणि दगड सतत बाहेर पडत आहेत. जपानच्या हवामान संस्थेने सांगितले की, स्थानिक वेळेनुसार रात्री 8:05 वाजता साकुराजिमा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. आजूबाजूच्या लोकांना घर रिकामे करण्यास सांगितले. एका रिपोर्टनुसार जेएमएने पाचव्या स्तराचा अलर्ट जारी केला आहे.या स्फोटामुळे जपानी अधिकाऱ्यांचा तणावही वाढला आहे कारण त्याच्यापासून काही किलोमीटर अंतरावर एक अणुभट्टी आहे. स्थानिक वेळेनुसार रविवारी रात्री ८.०५ वाजता या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचे जपानच्या हवामान खात्याने म्हटले आहे. जपानी एजन्सीच्या पाळत ठेवणार्या कॅमेर्यांनी ज्वालामुखीतून धूर किंवा राखेचे लोट उठताना दाखवले.नागरिकांना अति दक्षतेचा इशारा देत रिसर रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नाही तर कागोशिमा प्रीफेक्चर आणि कागोशिमा शहरातील लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.जपान सरकारच्या एनएचके टिव्हीवर ही दृश्ये प्रसारित केली होती. उप मुख्य कॅबिनेट सचिव योशोहिको इसोजकी यांनी सांगितले की, सरकार आता नागरिकांच्या जीवाला प्रथम प्राधान्य देत आहे. सध्या तिथल्या स्थितीचा संपूर्ण आढावा आम्ही घेत आहोत.
साकुराजिमा ज्वालामुखी हा जपानमधील सर्वात सक्रिय ज्वालामुखीपैकी एक आहे. भूतकाळात, या ज्वालामुखीचा अलिकडच्या दशकात अनेक वेळा उद्रेक झाला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला त्याचा उद्रेक झाला आणि हवेत राखेचे ढग कित्येक किलोमीटर वर पसरले.
हा ज्वालामुखी जपानच्या दक्षिण भागात असलेल्या कागोशिमा प्रांतात आहे. ज्वालामुखीशास्त्रज्ञ रॉबिन जॉर्ज अँड्रीव्ह यांनी सांगितले की, संपूर्ण परिसर ज्वालामुखीच्या उद्रेकासाठी पूर्णपणे तयार आहे.
परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. तसंच, स्थानिक अधिकाऱ्यांना सध्या घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.