कलात्मक समीक्षेची परंपरा सुरू करणारे बुकर पुरस्कार विजेते कांदबरीकार जॉन बर्जर यांचे नुकतेच निधन झाले. बर्जर 90 वर्षांचे होते.
पॅरिसमधील अँटनी भागातील राहत्या घरी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. मागील वर्षभरापासून ते आजारी होते, अशी माहिती द टिलिग्राफने दिली आहे. मार्क्सवादी मर्मज्ञ म्हणून ओळखले जाणारे बर्जर यांच्या 'वेज ऑफ सीईंग' या 'बीबीसी'वरील मालिकेतून कलात्मक समीक्षेमध्ये एक राजकीय दृष्टिकोन आणला.