Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नाआधीच पिता होणार हा धडाकेबाज क्रिकेटर!

लग्नाआधीच पिता होणार हा धडाकेबाज क्रिकेटर!
मुंबई- इंग्लंड क्रिकेट टीमचा उपकर्णधार जो रूट भारताविरूद्ध होणार्‍या वनडे सीरिजमध्ये सुरूवातीच्या मॅचमध्ये टीममध्ये नसणार आहे. जगातील उत्कृष्ट फलंदाजांच्या यादीत नाव असणारा जो रूट लवकरच पिता बनणार आहे. मात्र, जो रूटने अजून विवाह केलेला नाही.
 
भारताच्या विरोधात टेस्ट सीरिजमध्ये रूटने इंग्लंडकहून सर्वाधिक रन केले होते. त्यामुळे टीममध्ये त्याची अनुपस्थिती टीमला जाणवणार आहे. रूटचं म्हणणं आहे की, जोपर्यंत त्याची लाईफ पार्टनर बाळाला जन्म देत नाही तोपर्यंत ‍तो तिच्यासोबत राहणार आहे. त्यामुळे वनडे सीरिजमध्ये तो नाही खेळणार.
 
रूट आणि त्याची पार्टनर केरी कोटरेलचा साखरपुडा झाला आहे. रूट आणि केरी कोटरेल खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर मार्च 2015 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2030 पर्यंत भारत विज्ञानात टॉप थ्री मध्ये