कतारमधील राजघराण्याने न्यूयॉर्कमध्ये तब्बल ४१ मिलियन डॉलर म्हणजेच २६५ कोटींचा बंगला खरेदी केला आहे. हा आलिशान बंगला त्यांनी त्यांच्या नोकरांसाठी खरेदी केला आहे.
कतार येथील रॉयल फॅमिली न्यूयॉर्कमध्ये त्यांची तिसरी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. १० हजार ४०० स्क्वेअर फूटाचा हा पाच मजली बंगला सर्व आधुनिक सोई सुविधांनी परिपूर्ण आहे. यामध्ये मोठ-मोठे डायनिंग हॉल, बार, क्लब, लाइब्रेरी, जिम, मसाज आणि प्लेरूम सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या बंगल्याची किंमत २७५ कोटी रुपये होती. खरेदी केलेल्या या बंगल्याजवळील आणखी दोन घरेही त्यांचीच आहेत. २००२ मध्ये कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी १८० करोडमध्ये खरेदी केला होता. पाच मजली बंगल्याबाहेर ५०० चौ. फूटमध्ये गार्डन आहे. तसेच शानदार मास्टर बेडरूमसोबत पाच बेडरूम आहेत. पांच लक्जरी बाथरूम, स्विमिंग पूल आणि ९२२ चौ. फूटचे शानदार किचन आहे.