Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

भीषण आगेत 76 जणांचा होरपळून मृत्यू

fire at ski resort turkey
, बुधवार, 22 जानेवारी 2025 (11:46 IST)
Turkish Province News : बोलू प्रांतातील कार्तलकाया स्की रिसॉर्टमध्ये मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. स्थानिक वेळेनुसार पहाटे 3:27 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. रिसॉर्टच्या रेस्टॉरंटच्या मजल्यावर आग लागली आणि काही वेळातच ती वेगाने पसरली. यामुळे 12 मजली कार्तलकाया स्की रिसॉर्टमध्ये खळबळ उडाली.  
ALSO READ: ट्रक दरीत कोसळून 10 जणांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार तुर्कीच्या बोलू प्रांतातील कार्तलकाया स्की रिसॉर्टमध्ये मंगळवारी लागलेल्या आगीत आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती, परंतु काही काळानंतर हा आकडा 66 पर्यंत वाढला. आता मृतांचा आकडा 76 वर पोहोचला आहे. काही लोक आगीत भाजल्यामुळे मरण पावले, तर काहींना गुदमरून जीव गमवावा लागला. तसेच आग लागल्यानंतर काही लोकांचा जीव वाचविण्यासाठी घाबरून रिसॉर्टच्या खिडकीतून उडी मारल्याने मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती समोर आली आहे.

 आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवल्या. बऱ्याच प्रयत्नांनंतर रिसॉर्टमधील आग विझवता आली. या आगीमुळे रिसॉर्टचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा कार्तलकाया स्की रिसॉर्टमध्ये 234 लोक होते.

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्रक दरीत कोसळून 10 जणांचा जागीच मृत्यू