Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मॉरिशस: क्रेडिट कार्डाने शॉपिंग केले, राष्ट्राध्यक्ष पद जाणार

मॉरिशस:  क्रेडिट कार्डाने शॉपिंग केले, राष्ट्राध्यक्ष पद जाणार
मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्ष अमीना गुरिब फकीम यांनी एका  क्रेडिट कार्डाने शॉपिंग केल्यामुळे  त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
 
अमीना यांना प्लॅनेट अर्थ इन्स्टिट्यूट नावाच्या एका एनजीओने एक क्रेडिट कार्ड दिलं होतं. ही संस्था शैक्षणिक विकासासाठी शिष्यवृत्ती देण्याचं काम करते. अमीना या संस्थेच्या अध्यक्षांपैकी एक असल्याने संस्थेने त्यांना हे कार्ड दिलं होतं. मात्र, या कार्डातून शिक्षण क्षेत्रासाठी काही खरेदी करण्याऐवजी अमीना यांनी इटली, दुबई अशा ठिकाणांहून कपडे आणि दागिने खरेदी केले. त्यावरून देशभरातून त्यांच्याविरोधी वातावरण निर्माण झालं. त्यामुळे त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागणार आहे.
 
मॉरिशसच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष असलेल्या अमीना १२ मार्च रोजी होणाऱ्या मॉरिशसच्या ५०व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पायउतार होतील. दरम्यान, मी निर्दोष असून मी त्या कार्डातून खरेदी केलेले पैसे परत केले आहेत, असं अमीना यांचं म्हणणं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुरेश प्रभूकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी