अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप यांचा बायको मेलानिया ट्रंपसोबतचा एक छोटासा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. ट्रंप बायकोसोबत आपल्या प्रथम इंटरनॅशनल ट्रिपवर निघाले आहे. याबाबतीत दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी डोनाल्ड इस्त्राईलला पोहोचल्यानंतर ही घटना घडली.
इस्त्राईलच्या बेन गुर्रियन एअरपोर्टला जेव्हा डोनाल्ड यांनी आपल्या पत्नीचा हात पकडण्यासाठी हात पुढे केला, तेव्हा मेलानिया यांनी त्यांचा हात झटकला. मात्र यावेळी इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपली पत्नी साराचा हात पकडलेला होता. अमेरिकेचे राष्ट्रपती आणि त्यांची पत्नी मेलानिया यांचा हा किस्सा कॅमेऱ्यात कैद झाला आणि बघता बघता सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रश्नचिन्हेही उपस्थित केले जात आहे की, खरोखर मेलानियाने ट्रम्प यांचा हात झटकला का? मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट टिवटरवर लोकांचे लक्ष सर्व कपल्सवर होते, सोशल मीडियावर नेटीझन्सने म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प आपल्या पत्नीला मागे सोडून पुढे निघून गेले आहेत, त्याचवेळी इस्त्राईलचे पंतप्रधान पत्नीसोबत चालत आहेत.