इस्लामाबाद- भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेर ठरवून पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट होण्याची शक्यता आहे. या भेटीत कुलभूषण जाधव यांच्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेची बैठक लवकरच कझकिस्तानमध्ये होणार आहे. रशिया, चीन व भारतासह पाकिस्तानही संघटनेचा सभासद आहे. या बैठकीत वेळी भारत व पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे.