Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माकडामुळे युद्धाची स्थिती, 20 लोकांचा मृत्यू

माकडामुळे युद्धाची स्थिती, 20 लोकांचा मृत्यू
, मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (12:12 IST)
लिबियाच्या स्थानीय मीडियाने वृत्त दिले आहे की एका माकडाने मुलीवर हल्ला केल्याने दोन कुळा (क़बीलों)मध्ये हिंसक संघर्ष झाला.  दक्षिणी लिबियाच्या सबा शहरात झालेल्या या घटनेनंतर झालेल्या विवादात किमान 20 लोकांचा मृत्यू झाला आहे.  
 
सबा शहरात एक पाळीव माकडाने एका शाळेकरी छात्रावर हल्ला केला होता. वृत्तानुसार माकडाने मुलीचे हिजाब ओढले होते आणि तिला चावले देखील. हा माकड गद्दाफ़ा कुळाचा होता आणि या घटनेमुळे नाराज औलाद कुळातील मुलीच्या कुटुंबीयांनी प्रत्युत्तर हल्ला केला.  
 
यानंतर औलाद सुलेमान आणि गद्दाफ़ा कुळामध्ये बर्‍याच दिवसंपर्यंत हिंसा सुरूच राहिली. सुरुवाती संघर्षात माकड समेत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार दोन्ही कुळामध्ये टँक, रॉकेट, मोर्टार आणि भारी शस्त्र चालल्यामुळे 50 लोक जखमी झाले आहे. गद्दाफ़ा मुळाचा लिबियाचे माजी शासक मुअम्मर गद्दाफ़ीच्या ह्या समुदायाशी संबंध आहे. या घटनेनंतर मरणार्‍यांची सख्या वाढण्याची शक्यता आहे कारण सुलेमान समुदायात मरणार्‍या लोकांचे वृत्तच समोर आले आहे. लिबियाच्या दक्षिणेतील उपेक्षित भागात स्थित सबा प्रवाशी आणि शस्त्रांच्या तस्करीचे गढ मानले जाते. 2011मध्ये मुअम्मर गद्दाफ़ीला हटवण्यानंतर लिबियामध्ये सत्तेचा संघर्ष सुरू आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फसवणुकीचा खटला मिटवणार