चीनमध्ये मोठ्या संख्येने मुलांना आजारी बनवल्यानंतर, न्यूमोनियाची लक्षणे असलेल्या नवीन विषाणूने युरोपलाही धडक दिली आहे. दरम्यान, यूके मेडिकल सायन्स आणि चेस्टर मेडिकल स्कूलचे प्रोग्राम लीड डॉ गॅरेथ नी म्हणाले, ही स्थिती कोविड -19 सारखी नवीन आजार नाही परंतु, हा आणखी एक कोविड व्हायरस असू शकतो. ब्रिटीश शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी रुग्णालयांमध्ये आजारी मुलांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, तरीही सध्या या विषाणूबद्दल घाबरण्याची गरज नाही.
चीननंतर डेन्मार्क आणि नेदरलँडमधील मुलांमध्ये निमोनियासारखी लक्षणे दिसून आली आहेत. इन्फेक्शन डिसीज न्यूज ब्लॉग एव्हियन फ्लू डायरीच्या अहवालानुसार, मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाचा संसर्ग महामारीच्या पातळीवर पोहोचला आहे.