Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तर कोरियाने पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले; जपानच्या पंतप्रधानांनी अलर्ट जारी केला

उत्तर कोरियाने पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले; जपानच्या पंतप्रधानांनी अलर्ट जारी केला
, गुरूवार, 27 जून 2024 (00:20 IST)
अमेरिका आणि दक्षिण कोरियासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली. उत्तर कोरियाने मंगळवारी संशयास्पद बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यामुळे देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 
जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने आणखी एक ट्विट केले. उत्तर कोरियाने डागलेले संशयित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र जपानपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले. त्यामुळे अलर्ट काढण्यात येत आहे. त्याचवेळी, लोकांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास त्वरित कळवावे, असे आवाहनही पीएमओने केले आहे. 
 
याशिवाय पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना विमान आणि जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व शक्य उपाययोजना करण्यास सांगितले . माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे,तसेच लोकांकडून माहिती गोळा करा.  असे ते म्हणाले
 
उत्तर कोरियाकडून वारंवार होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे सांगण्यात आले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने एका संयुक्त निवेदनात इंडो-पॅसिफिक जलक्षेत्रातील स्थिती बदलण्याच्या कोणत्याही एकतर्फी प्रयत्नांना तीव्र विरोध केला आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तर कोरियाच्या अलीकडील प्रक्षेपणाचा तीव्र निषेध केला.

Edited by - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विकीलीक्सचे ज्युलियन असांज अखेर 14 वर्षांनंतर मायभूमीत परतले