पाकिस्तानातील रावळपिंडीमध्ये डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने रावळपिंडी जिल्हा डेंग्यूसाठी सर्वाधिक संवेदनशील म्हणून घोषित केला आहे. द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पंजाबच्या आरोग्य विभागाने लाहोर जिल्हा सर्वात असुरक्षित म्हणून घोषित केला आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात एक हजाराहून अधिक पथके तयार करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाभरात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या 91 वर पोहोचली असून, त्यापैकी 29 रुग्णांमध्ये डेंग्यूचे विषाणू आढळून आले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. डेंग्यूच्या वाढत्या संख्येबद्दल अधिक तपशील देताना, अधिकाऱ्याने सांगितले की कहूता आणि चक जलालदीन हे क्षेत्र आहेत जिथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. याशिवाय शहराच्या अंतर्गत भागातील वस्ती व कॅन्टोन्मेंट परिसरात सातत्याने डेंग्यूच्या अळ्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
धिकाऱ्याने सांगितले. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 98,120 घरांची तपासणी केली असता 1,357 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. डेंग्यूविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून 297 इमारती सील करण्यात आल्या, तर निष्काळजीपणासाठी आतापर्यंत 23 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.