इस्लामाबाद -हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सैद सलाहुद्दीन याला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा अमेरिकेचा निर्णय पाकिस्तानने फेटाळून लावला आहे. यासंदर्भात पाकिस्तानी पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अझिझ यांनी त्यांच्या देशाची मुजोरपणाची भूमिका मांडली.
सलाहुद्दीनला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेले नाही. त्यामुळे अमेरिकेचा निर्णय स्वीकारण्यास आम्ही बांधील नाही. भारताच्या समाधानासाठी अमेरिकेने ते पाऊल उचलले. अमेरिकेच्या मार्फत चीनवर दबाव टाकण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे, असा कांगावाही त्यांनी केला.
सलाहुद्दीनने मागील 28 वर्षांपासून पाकिस्तानात आश्रय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. त्यामुळे प्रचंड अस्वस्थ बनलेल्या पाकिस्तानची सलाहुद्दीनला स्वातंत्र्यसैनिक ठरवण्यापर्यंत मजल गेली आहे.