वॉशिंग्टन- अमेरिकी दौर्यावर गेलेल्या पाकिस्तान पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांना जॉन एफ केनेडी विमानतळावर त्यावेळी लज्जास्पद स्थितीला सामोरा जावे लागले जेव्हा तपासणीच्या नावाखाली त्यांचे कपडे उतरवण्यात आले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात अब्बासी यांची सामान्य नागरिकांप्रमाणे कपडे उतरवून तपासणी करण्यात आली. एखाद्या पंतप्रधानाला अशी वागणूक देण्याची जगातली ही पहिलीच वेळ असावी.
मागील आठवड्यात ते आपल्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी खासगी दौर्यावर अमेरिका गेले होते. तसेच या दरम्यान त्यांनी अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष माईक पेंस यांची ही भेट घेतली. पाक मीडियाने या तपासणीची निंदा करत म्हटले की खासगी दौर्यातही अशाप्रकारे तपासणी करणे देशाचे अपमान आहे.
उल्लेखनीय आहे की यापूर्वी ट्रंप प्रशासनाने सुमारे 25.5 कोटी डॉलरची मदत राशी टाळली होती कारण त्यांच्याप्रमाणे पाकला दहशतवादाविरुद्ध अधिक सख्त होण्याची गरज आहे.