प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे 76 वर्षाच्या वयात निधन झाले. यांचे केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झाले.
हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवरी 1942 रोजी फ्रेंक आणि इसाबेल हॉकिंग यांच्या घरात झाले होते. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची आई इझाबेल ऑक्सफर्डची पदवीधर होती. हॉकिंग यांना संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती तसेच विज्ञान विषयातही रस होता. गणिताचे शिक्षण घ्यायवयाची इच्छा असली तरी त्यांच्या वडिलांना त्यांनी ऑक्सफर्ड युन्विहर्सिटीत प्रवेश घ्यावा, असे वाटत होते. १९५९ साली त्यांनी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती. त्यांनी १९६२ मध्ये ऑक्सफर्डमधून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. केंब्रिज विद्यापीठात त्यांनी ३० वर्षे गणिताचे अध्यापन केले. विश्वशास्त्र आणि क्वांटम ग्रॅव्हिटी शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांचे योगदान मोठे होते.
२००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले होते. कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने त्यांना गौरवले होते. त्यांच्याकडे 12 मानद उपाधी होत्या.
लेखक म्हणून द ग्रँड डिझाईन, युनिव्हर्स इन नटशेल, माय ब्रीफ हिस्ट्री, द थिअरी ऑफ एव्हरीथिंग ही हॉकिंग यांची पुस्तके जगप्रसिद्ध आहेत. विश्वाच्या उत्पत्तीच्या रहस्यांवर आधारित 'अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम' हे पुस्तक खूप गाजले.