इस्रायली पोलिसांनी बुधवारी जेरुसलेम मधील वादग्रस्त शेख जर्रा परिसर फिलीस्तीन नागरिकांकडून रिकामा केला. शेख जर्राच्या निवासी इमारतींमध्ये राहणाऱ्या फिलीस्तीनीची या आठवड्यात हा परिसर रिकामा करण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांशी हिंसक संघर्ष झाला. जवळपासच्या परिसरात असलेल्या इतर अनेक मालमत्ताही वादात सापडल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन, हिंसक घेराव आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या संशयावरून अधिकाऱ्यांनी अनेकांना अटक केली. शेख जर्रा येथे राहणाऱ्या सल्हिया कुटुंबाचे म्हणणे आहे की त्यांनी ही मालमत्ता 1967 पूर्वी खरेदी केली होती, तर प्रशासनाने या दाव्याला न्यायालयात आव्हान दिले आहे.
जेरुसलेम महानगरपालिकेने 2017 मध्ये विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने मालमत्ता जप्त केली. तर सल्हिया कुटुंबाने येथे रोपांची रोपवाटिका चालवली.
गेल्या वर्षी, जेरुसलेम न्यायालयाने, शहर प्रशासनाच्या बाजूने निर्णय देताना, परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले. साल्हिया कुटुंबीयांनी या निर्णयाविरोधात अपील दाखल केले असून, त्यावर निर्णय येणे बाकी आहे. मात्र, न्यायालयाने जागा रिकामी करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली नाही.