Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99 व्या वर्षी निधन

प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99 व्या वर्षी निधन
, शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (18:19 IST)
राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं. बकिंगहॅम पॅलेसने ही घोषणा केली.
 
बकिंगहॅम पॅलेसकडून आलेल्या पत्रकात म्हटलं आहे, "अतीव दुःखाने हर मॅजेस्टी राणी एलिझाबेथ त्यांचे प्रिय पती हिज रॉयल हायनेस द प्रिन्स फिलीप, ड्यूक ऑफ इडिनबरा यांच्या निधनाची बातमी जाहीर करत आहेत.""हिज रॉयल हायनेस आज सकाळी विंडसर कॅसलमध्ये शांतपणे निवर्तले."
 
राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) आणि प्रिन्स फिलीप यांचं लग्न 1947 मध्ये झालं. त्यांना चार मुलं, आठ नातवंडं आणि दहा पतवंडं आहेत.
 
त्यांचे पहिले पुत्र प्रिन्स ऑफ वेल्स, प्रिन्स चार्ल्स यांचा 1948 मध्ये जन्म झाला होता, त्यांच्यानंतर त्यांच्या भगिनी, द प्रिन्सेस रॉयल, प्रिन्सेस ॲन यांचा 1950 मध्ये, 1960 साली ड्यूक ऑफ यॉर्क प्रिन्स अँड्र्यू यांचा आणि 1964 साली अर्ल ऑफ वेलेक्स प्रिन्स एडवर्ड यांचा जन्म झाला.
 
प्रिन्स फिलीप यांचा 10 जून 1921 रोजी कोर्फू या ग्रीक बेटावर जन्म झाला होता. त्यांचे वडील प्रिन्स अँड्र्यू ऑफ ग्रीस अँड डेन्मार्क हे राजे जॉर्ज (पहिले) ऑफ हेलेनेस यांचे कनिष्ठ पुत्र होते.
 
त्यांच्या आई प्रिन्सेस ॲलिस लॉर्ड माउंटबॅटन यांची मुलगी आणि राणी व्हिक्टोरिया यांची नात होत्या.
 
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले, प्रिन्स फिलीप हे असंख्य तरुणांसाठी प्रेरणास्थान होतं.
 
डाउनिंग स्ट्रीट इथून बोलताना बोरिस म्हणाले, राजघराण्याला योग्य वाटचाल करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाट होता. राष्ट्राचा समतोल आणि सुख जपण्यासाठी राजघराणं एक व्यवस्था म्हणून अग्रणी ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
 
स्कॉटलंडच्या फर्स्ट मिनिस्टर निकोला स्ट्रेजन यांनी फिलीप यांच्या निधनाने अतीव दु:ख झाल्याचं सांगितलं. "राणी एलिझाबेथ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मी सांत्वनपर संदेश पाठवला आहे", असं त्यांनी सांगितलं.
 
मार्च महिन्यात, द ड्यूक ऑफ एडिंबरा यांना महिनाभराच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आलं.
 
सेंट बॉर्थोलेम्यू हॉस्पिटलात, त्यांच्यावर हृदयविकाराशी संबंधित उपचार करण्यात आले.
 
दुसऱ्या महायुद्धात देशाचं प्रतिनिधित्व केलेल्या मोजक्या लोकांमध्ये प्रिन्स फिलीप यांचा समावेश होता असं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं.
 
"अतुलनीय धुरीण गमावले" अशा शब्दात लेबर पक्षाचे सर केइर स्टारमेर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राणीप्रती त्यांची निष्ठा अपवादात्मक अशी होती असं स्टारमेर म्हणाले.
 
द आर्चबिशप ऑफ कँटरबरी जस्टीन वेल्बे यांनी सांगितलं की, प्रिन्स फिलीप यांनी सदैव अन्य लोकांचं हित जपलं. ख्रिश्चन धर्माला जागणारं असंच त्यांचं वागणं होतं.
 
कोरोना संकटातून बाहेर येत असताना, आपल्याला लोकांप्रती कनवाळू भाव आणि अजोड निष्ठा दाखवावी लागणार आहे. प्रिन्स फिलीप यांच्या आयुष्याने आपल्याला ही शिकवण मिळाली आहे असंही ते म्हणाले.
 
"प्रिन्स फिलीप यांच्या निधनापश्चात, ब्रिटिश नागरिक आणि राजघराण्याच्या दु:खात मी सहभागी आहे. लष्करी सेवेत असताना त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं होतं. असंख्य सामाजिक उपक्रमांची मुहुर्तमेढ रोवण्यात ते अग्रणी होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो", अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रिन्स फिलीप यांना श्रद्धांजली वाहिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाची लस घेतल्यानंतरही संसर्ग झालेले डॉक्टर 'लस घ्याच' असं का म्हणतायेत?