एकदा चार्ज केल्यावर एखादी कार आपल्याला 800 किलोमीटर पर्यंत घेऊन जाईल तेही हवेत उडत, तर कोणीही हैराण होईल. परंतू, कार कंपनी रोल्स रॉयस 2020 पूर्वी बाजारात अशी कार लाँच करणार आहे जी एका तासात 40 किलोमीटर उड्डाण भरेल.
ही टॅक्सी कार एकदा चार्ज केल्यावर 800 किलोमीटर दुरीचा प्रवास करेल. या कारमध्ये पाच प्रवाशी बसू शकतात. ही कार 2020 पूर्वी बाजारात येण्याची योजना आहे.
या कारची विशेषता म्हणजे कार पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची गरज नाही. कंपनीने कारमध्ये 500 किलोवाट ऊर्जा उत्पन्न करणारी एम 250 गॅस टरबाइन टेक्नोलॉजी वापरली आहे. ही कार स्टार्ट झाल्यावर अधिक आवाज ही करणार नाही कारण यात हायब्रिड डिझाइन इंजिन लावण्यात येईल.