मॉस्को- रशियाहून सिरीयाला जाण्यासाठी निघालेले आणि उड्डाणानंतर काही वेळातच रडारवरून गायब झालेले रशियाचे लष्करी विमान काळ्या समुद्रात कोसळायचं स्पष्ट झाले. या विमानात 83 प्रवासी आणि आठ कर्मचारी होते.
टीयू 154 या विमानाने सोची एडलर एअरपोर्टवरून स्थानिक वेळेनुसार पहाटे 5.20 वाजता उड्डाण केले होते. त्यानंतरच पुढच्या 20 मिनिटांतच त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. हे विमान गायब झाल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे लगेचच रशियन लष्करानं शोधमोहीम हाती घेतली. त्यात, हे विमान काळ्या समुद्रात कोसळायचे उघडकीस आले. विमानाचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की मानवी चुकामुकी झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. दुर्घटनेचे कारण शोधून काढण्यासाठी ब्लॅक बॉक्स सापडणे आवश्यक आहे.