Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शबरीमाला येथे चेंगराचेंगरी, किमान २५ जण जखमी

शबरीमाला येथे चेंगराचेंगरी, किमान २५ जण जखमी
, सोमवार, 26 डिसेंबर 2016 (10:14 IST)
केरळातील शबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये किमान २५ जण जखमी झाले आहेत.  अय्यप्पा स्वामींच्या सुवर्णालंकारांची मिरवणूक सुरू असताना चेंगराचेंगरी झाली. गंभीर जखमींना पम्बा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भक्त हे बऱ्याच वेळापासून अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाची आस लावून उभे होते. काही लोकांनी रांग तोडली आणि त्यानंतर चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. अय्यप्पा स्वामी मंदिरात उत्सव चार दिवसांचा उत्सव सुरू आहे. जेव्हा अय्यप्पा स्वामींचे सुवर्णालंकार आणले जात होते तेव्हा खूप गर्दी जमा झाली. त्यावेळी काही लोकांनी रांगा मोडल्यामुळे एकच गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता तिरूपतीच्या दर्शनासाठीही आधार कार्डची आवश्यक