Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

सूडानमध्ये लष्करी विमान कोसळले, ४६ जणांचा मृत्यू

Aircraft Crash
, बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 (16:11 IST)
Sudan News: सूडानमध्ये पुन्हा एकदा विमान अपघाताचे बळी ठरले आहे. अपघातानंतर विमान ज्या भागात पडले त्या भागातील अनेक घरांचे नुकसान झाले. या अपघातात ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.
ALSO READ: धक्कदायक : विरारमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, ४५ वर्षीय आरोपीला अटक
मिळालेल्या माहितीनुसार सूडानची राजधानी खार्तूमच्या बाहेर एक लष्करी विमान कोसळले आहे. या विमान अपघातात ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी उशिरा लष्कराने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानतळावरून उड्डाण घेत असताना विमान कोसळले, त्यात लष्करी कर्मचारी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहे. दोन मुलांसह पाच जखमी नागरिकांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तसेच "जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अपघातस्थळी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले," असे निवेदनात म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अँटोनोव्ह विमानाच्या अपघातासाठी तांत्रिक बिघाड जबाबदार होता. वाडी सीदना विमानतळाजवळ हा अपघात झाला.  
अनेक घरांचे नुकसान झाले
विमान कोसळलेल्या भागात अनेक घरांचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. उत्तर ओमडुरमनमधील रहिवाशांनी सांगितले की विमान अपघातामुळे मोठा स्फोट झाला, ज्यामुळे जवळपासच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Marathi Bhasha Gaurav Din 2025 मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा